शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांची सावध खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:05 IST

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : शुक्रवारी रात्रीची वेळ.. कºहाडला वाखाण रस्ता परिसरात एका लॉनवर पडलेले एलईडीचे प्रकाशझोत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते. उत्सुकतेपोटी चौकशी केली असता पाटलांच्या हिरवळीवर राजकीय क्रिकेटचा सराव होणार असल्याचे समजले. रात्री पावणेअकरा वाजता मंत्री चंद्रकांत पाटील आल्यावर खेळ सुरू झाला. जयवंत पाटील यांनी सुरुवातीलाच जलद गोलंदाजी ...

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : शुक्रवारी रात्रीची वेळ.. कºहाडला वाखाण रस्ता परिसरात एका लॉनवर पडलेले एलईडीचे प्रकाशझोत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते. उत्सुकतेपोटी चौकशी केली असता पाटलांच्या हिरवळीवर राजकीय क्रिकेटचा सराव होणार असल्याचे समजले. रात्री पावणेअकरा वाजता मंत्री चंद्रकांत पाटील आल्यावर खेळ सुरू झाला. जयवंत पाटील यांनी सुरुवातीलाच जलद गोलंदाजी केली. राजेंद्र यादव यांनी मध्यम गतीचे बॉल टाकले तर कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनीही सावधच बॅटिंग करीत इथली मॅच कशी जिंकायची? याचे धडेच जणू अतुल भोसले अन् शेखर चरेगावकर यांना दिले, असेच म्हणावे लागेल.रात्री आठ वाजल्यापासून कºहाड पालिकेचे राजकीय ‘खेळाडू’ अन् शहरातील क्रीडाप्रेमी येथे दाखल व्हायला सुरुवात झाली; पण खेळ काही सुरू होईना. तेव्हा कोल्हापूरचे पाटील येणार असल्याचे समजले. रात्री उशिरा पावणेअकरा वाजता ते आल्यावर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हिरवळीवर अखेर खेळ सुरूच होता.पालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पाटील शनिवारी कºहाडात दाखल झाले.. ‘यशवंत’रावांच्या भूमीत भाजपला ‘जयवंत’ व्हायचे असेल तर अगोदर पाटलांच्या घरी स्नेहभोजन घेऊनच सुरुवात करावी लागेल. हे त्यांना चांगलंच माहिती होतं. मंत्री पाटील यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. त्याची चर्चा शहरभर पोहोचली होती. उशीर झाला तरी जनशक्तीचे ‘मेहरबान’ पाटील यांची वाट पाहत होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्याधिकारी डांगेंनी विकासकामांचा आढावा सादर केला. त्यानंतर उपनगराध्यक्ष पाटील यांनी जलद गोलंदाजी करत पूर्वीच्या सरकारपेक्षा आत्ताच्या भाजप सरकाने कमी वेळात चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून २२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही ‘दादा’ निधी देण्यास कमी पडणार नाहीत. फक्त कºहाडात भाजपची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर राजेंद्र यादव व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.या साºयानंतर चंद्रकांत पाटील बॅटिंगसाठी उभे राहिले. काही माणसांना काम करता येतं; पण ते मांडता येत नाही. काहींना मांडता येतं; पण प्रत्यक्षात करता येत नाही. मात्र, राजेंद्र यादवांकडे हे दोन्ही गुण असल्याचे सांगत फटकेबाजीला सुरुवात केली. त्याला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. ते पुढे म्हणाले, ‘अखंड महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे तुमच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू,’ असे सांगत चांगली कामे केल्यावर माणस आपोआप आपल्याबरोबर येतात, असे डॉ. अतुल भोसलेंकडे बघत त्यांनी सांगितले. त्यावेळीही खसखस पिकली.भोसले व चरेगावकर हे तर मार्गदर्शकच : राजेंद्र यादवयावेळी राजेंद्र यादवांनी मध्यम गतीचा बॉल टाकत चंद्रकांत पाटील येथे आले म्हणजे ‘जणू सरकार आपल्या दारी’ आलं आहे. असं सांगत तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत आणि आमची झोळी काही फाटकी नाही. तेव्हा भरघोस निधी द्या ! अशी मागणी केली. त्याचवेळी डॉ. अतुल भोसले व शेखर चरेगावकर हे तर आमचे मार्गदर्शकच असल्याचे मंत्री पाटील यांना सांगितले...अन् हशा पिकलाकार्यक्रमादरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘या ठिकाणी साºयांच वक्त्यांनी कºहाड शहराच्या विकासासाठी माझ्याकडे निधीची मागणी केली. हे ऐकून बरं वाटलं. पण तुम्हाला सांगतो, आम्ही विकास निधी देताना पार्टी, पक्ष, गटतट काही पाहत नाही. हवे तर पृथ्वीबाबा चव्हाण अन् बाळासाहेब पाटील यांना विचारा,’ मग ते सांगतील, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.